राज्यात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जाेरदार तयारी सुरु आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून याबाबत पात्र जारी केले आहे. मात्र अद्याप भाजपकडून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. यामुळे या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
अखेर सुधीर तांबेच, काँग्रेसकडून नाशिक पदवीधरचे उमेदवार ...
Letsupp Krushi
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असून याबाबत पक्षाने पात्र देखील जरी केले. यामुळे सत्यजित तांबे यांच्या नावाची सुरु असलेली चर्चेला अखेर विराम देण्यात आला आहे. असे असताना मात्र दुसरीकडे भाजपने अद्याप देखील त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही आहे.
सत्यजीत तांबे यांची प्रतिक्रिया
नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपकडून काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. यावर सत्यजीत तांबे म्हणाले, ”कोण काय म्हणतं? यापेक्षा मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. हे सर्वांना माहिती आहे. असं सांगत या चर्चांवर सत्यजीत तांबे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान काँग्रेसच्या डॉ. तांबे यांना तुल्यबळ लढा देण्यासाठी भाजपने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे, धुळ्यातून धनराज विसपुते, तर नाशिकमधून व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, या तिघांनी अद्याप अर्ज घेतलेला नाही. दरम्यान, आज दि.१२
जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज नेमकी कोण उमेदवारी अर्ज भरणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

