महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस

image

अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. याप्रकरणी काल त्यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयाोगावरही टीकास्र सोडले.

महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस...

Letsupp Krushi

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली आहे. या नोटीसमध्ये महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसात खुलासा करण्याचं आव्हान करण्यात आले आहे. १९९३  कलम ९२ (२) (३) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस पाठवली असून खुलासा सादर करावा. अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.

या अगोदर महिला आयोगाने अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती. मात्र, उर्फीला जाणीवपूर्वक नोटीस पाठवत नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी महिला आयोगावर केला आहे. 

पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर म्हणाल्या...

 चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत खोटी माहिती दिली, कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार आहे. महिला आयोगानं तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात येत आहे.

Agronext