आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. परंतु कृषीप्रधान असलेल्या या देशात शेती करणं तितकं सोपं राहिले का? आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला कवडीचा कवडीचा भाव मिळत आहे. अनेकदा शेतमालाची होणारी ही नासधूस पाहता सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ पाहत आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. शेतीला सर्वात मोठी गरज असते ती पाण्याची. याच पाण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा योजनेंतर्गत अनुदान दिले जाते.
नवीन विहीर खोदण्यासाठी आता मिळणार एवढ्या लाखांचे अनुदान...
Letsupp Krushi
नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी खूप पैसा लागतो. पैशांअभावी हे काम रखडलं जात, आता विहिरच नाही म्हणल्यावर शेती पिकाला पाणी कोठून जाणार? असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच आता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीरीसाठी अनुदान दिले जात आहे. आता या अनुदान वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन विहिरसाठी तब्बल ४ लाखांच अनुदान या योजनेंतर्गत मिळणार आहे. या संदर्भात ४ नोव्हेंबर २०२२ रोजी शासन निर्णय घेण्यात आला होता.
काय आहे लाभधारकाची पात्रता?
• अर्जदाराकडे १ एकर शेतजमीन सलग असावी.
• पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.
• दोन विहिरींमध्ये १५० मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून १५० मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
• लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
• एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे ८ -अ उतारा असावा.
• एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचं सलग क्षेत्र १ एकरपेक्षा जास्त असावे.
• अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.
आवश्यक कागदपत्रे
• सातबाराचा ऑनलाईन उतारा
• ८-अ चा ऑनलाईन उतारा
• मनरेगा जॉब कार्डची प्रत
• सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून ४० गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा व समोपचारानं पाणी वापराबाबतचे करारपत्र.