शेळी मेंढीपालन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक निर्माण करून शेळ्या मेंढ्यांच्या जातींचा विकास करण्याकरिता शेळ्या, मेंढ्यांचे पैदास प्रकल्प स्थापन करणे ही योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सन २०२१-२२ मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळ्या, मेंढ्यांचे पैदास प्रकल्प स्थापन करणे ही योजना कार्यान्वित झाली आहे. योजनेमध्ये वैयक्तिक व्यक्ती, स्वयंसाह्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट आणि कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना भांडवली खर्चावर अनुदान देऊन उद्योजकांची निर्मिती करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनो असे घ्या शेळी, मेंढीपालनाकरिता ५० टक्के अनुदान.. ...
Letsupp Krushi
या योजनेमध्ये १०० ते ५०० शेळ्या किंवा मेंढ्यांचा पैदास प्रकल्प स्थापन करण्याकरिता प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर ५० ℅ अनुदान देण्यात येते. उर्वरित निधी कर्ज स्वरूपात बँक अथवा वित्तीय संस्थेमार्फत किंवा स्वनिधीमधून उपलब्ध करावयाचा आहे.
हा आहे योजनेचा उद्देश;
शेळी, मेंढीपालन क्षेत्रामध्ये उद्योजक निर्माण करणे.
शेळी, मेंढीपालन व्यवसायाचे शाश्वत मॉडेल विकसित करणे.
एकात्मिक ग्रामीण शेळी मेंढी उत्पादन साखळी विकसित करण्याकरिता वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट तसेच कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे.
उद्योजकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन तसेच फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजच्या निर्मितीद्वारे असंघटित असलेले शेळी-मेंढीपालन क्षेत्राचे संघटित क्षेत्रामध्ये रूपांतर करणे.
शेळी, मेंढीपालन व्यवसायाच्या शास्त्रोक्त संगोपन पद्धतीचा तसेच पोषण आहार आणि रोग प्रतिबंध इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करणे.
बंदिस्त शेळी, मेंढीपालनास प्रोत्साहन.