आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देशातील जवळपास ६५ टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत करते. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच नुकसानीपोटी आता राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीग्रस्त १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ‘इतक्या’ कोटींची मदत ...
Letsupp Krushi
अतिवृष्टीग्रस्तांना कोट्यवधींची मदत
पुणे आणि नाशिक विभागातील १० जिल्ह्यातील सहा लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी बुधवारी दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसा भरपाई
लाभार्थी यादीसंदर्भात दिले निर्देश
राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुपटीने मदत जाहीर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळाली आहे, त्यांची यादी थेट जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना तब्बल ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.