कृषी विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित केलेल्या असतात. साहजिकच जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांची कायमच वर्दळ असते. योजनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी, अनुदान प्राप्तीसाठी अर्ज करणे हेतू शेतकरी झेडपीमध्ये जात असतात.
मात्र अहमदनगर जिल्हा परिषदेत एजंटचा सुळसुळाट माजला आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी भासून शेतकऱ्यांकडून दिवसाढवळ्या लूटमार सुरू आहे. योजनेचा लाभ मिळवून देतो असं म्हणत काही तोतया कर्मचारी जिल्हा परिषदेत भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.
शेतकऱ्यांनो सावधान! अनुदानाच्या नावाने हजारोचा चुना...
Letsupp Krushi
नुकतेच पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याला कडबाकुट्टी मिळवून देत म्हणत दहा हजाराला तोतया कर्मचाऱ्यांनी चुना लावला आहे. खरं पाहता सातत्याने या घटना घडत आहेत मात्र प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याने या फसवणूकीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी, पारनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याला कडबा कुट्टी मिळवून देतो म्हणून जिल्हा परिषदेत एका तोतया कर्मचाऱ्यांकडून बोलवण्यात आले. विशेष म्हणजे या इसमाने आपण जिल्हा परिषदेत काम करतो असं सदर शेतकऱ्याला भासवलं.
जिल्हा परिषदेत आल्यानंतर या ठिकाणी कॅमेरे आहेत तुम्ही स्वच्छतागृहात या असं सांगून त्या ईसमाने सदर शेतकऱ्याला स्वच्छतागृहात बोलवले आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून दहा हजार रुपये उकळलेत. दहा हजार घेतल्यानंतर तो तोतया कर्मचारी मी फाईल घेऊन येतो तुम्ही इथेच थांबा असं म्हणत तेथून फरार झाला.