टोमॅटोपासून बनवा रस, केचअप, सॉस, प्युरी

image

Agronext : टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी म्हणून ओळखला जातो , काढणीनंतर लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून टिकाऊ पदार्थ (product)  बनवल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून रस, केचअप, सॉस, प्युरी असे अनेक टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. याशिवाय लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी आहे.

टोमॅटो निवड  :
टोमॅटोपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्याचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ काळसर पडून खराब होऊ शकतात. प्रथम पूर्ण पिकलेले लाल टोमॅटो निवडून घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळांवरील हिरवे देठ  आणि खराब भाग काढून टाकावा. चाकूच्या साह्याने टोमॅटोचे लहान तुकडे करावेत. गॅसवर भांड्यामध्ये तुकडे ७० ते ९० अंश सेल्सिअस तापमानावर ३ ते ५ मिनिटे गरम करावेत. त्यामुळे टोमॅटो मऊ होण्यास मदत होऊन त्याचा लगदा तयार होईल. तयार लगदा पल्पर किंवा स्टीलच्या चाळणीत ओतून गाळून घ्यावा. तयार झालेला गर जास्त काळ साठवण्यासाठी त्यात सोडिअम बेन्झोएट १०० मिलिग्रॅम टाकावा. तयार रस किंवा गर निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून थंड आणि कोरड्या जागी साठवावे. या गराचा वापर सॉस प्युरी किंवा. केचअप साठी करता येतो.

टोमॅटो केचअप : 
साहित्य 
टोमॅटो पल्प १ किलो, लाल तिखट ५ ग्रॅम, साखर ७५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, लवंग, ५ नंबर व्हिनेगार २५ मिलि, सोडिअम बेन्झोएट ०.२५ ग्रॅम आणि विलायची, दालचिनी, बडीसोप, जिरे, मिरे बारीक कुटून घेतलेले प्रत्येकी १० ग्रॅम,.

कृती 
प्रथम टोमॅटोचा गर पातेल्यात घेऊन त्यात एकूण साखरेच्या १ तृतीयांश साखर टाकावी. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडात बांधून त्याची पुरचुंडी करावी. ही पुरचुंडी पातेल्यात रसामध्ये बुडवून ठेवावी. पातेले मंद आचेवर ठेवून मूळ रसाच्या तिसऱ्या भागापर्यंत रस आठवून घ्यावा. रस आठवून घेताना पळीने पुरचुंडीला हळूवारपणे अधून मधून सतत दाब द्यावा. म्हणजे मसाल्याचा अर्क रसामध्ये चांगला एकजीव होईल. व्हिनेगार व उरलेली साखर, मीठ, तिखट टाकून रस पुन्हा आठवून घ्यावा. तयार केचअप निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून झाकण लावून हवाबंद करावा. बाटल्या थंड व कोरड्या जागी साठवाव्यात

टोमॅटो प्युरी : 

  • बी व सालविरहित टोमॅटोचा आटवलेला रस ज्यात कमीत कमी ८.५ टक्के घन घटक असतात, त्या पदार्थाला टोमॅटो प्युरी असे म्हणतात.
  • टोमॅटो प्युरी तयार करण्यासाठी रस उघड्या भांड्यात ९० ब्रिक्‍स टी.एस.एस. येईपर्यंत आटवावा. तयार झालेली प्युरी प्लेन किंवा इन्यामल कॅनमध्ये किंवा बाटल्यात पॅक करून ८२ ते ८४ अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे गरम करून निर्जंतुक करावी. हवाबंद केलेली प्युरी सामान्य तापमानास ६ महिने चांगली टिकते. प्युरीचा वापर गरजेप्रमाणे केचअप किंवा वेगवेगळ्या भाज्या तयार करण्यासाठी होतो. प्युरीला हॉटेल व्यवसायात चांगली मागणी आहे.

टोमॅटो सूप 

साहित्य 
रस १ किलो, पाणी ३५० मिलि, कांदा १५ ग्रॅम, लोणी २० ग्रॅम, मीठ २० ग्रॅम, साखर २० ग्रॅम, लसूण, काळे मिरे, दालचिनी, विलायची, लवंग प्रत्येकी २ ग्रॅम

कृती 
टोमॅटोचा रस जास्त आंबट असल्यास खाण्याचा सोडा मिसळून रसाची आम्लता कमी करावी. एका कापडामध्ये सर्व मसाल्याचे पदार्थ बांधून त्याची पुरचुंडी करून रसामध्ये सोडावी. अधूनमधून मसाल्याच्या पुरचुंडीला दाबून त्याचा अर्क काढावा. १० टक्के रस घेऊन त्यात लोणी व स्टार्च मिसळून पेस्ट तयार करून ही पेस्ट पातेल्यातील उकळत्या रसात मिसळून एकजीव करावी. मिश्रण थोडे घनतेचे झाल्यावर त्यामध्ये साखर व मीठ मिसळून मिश्रण ३ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे. हे सूप ४० ते ५० दिवस टिकते. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.

सोनवणे चंद्रकला८४०८९७०९३७
(के.एस.के अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयबीड)

टोमॅटोपासून बनवा रस, केचअप, सॉस, प्युरी...

Letsupp Krushi

Agronext