मिनी डाळ मिल

image

तुरीवर प्रक्रिया करून त्यापासून डाळनिर्मिती करणे हा व्यवसाय शेतकऱ्यासांठी खूप मोलाचा ठरणार आहे .मराठवाडयातील बऱ्याच भागात तुरीचे उत्पादन घेतले जाते त्यांच्यासाठी हे वरदान ठरणार आहे .

आपण मिनी डाळ मिल चा विचार करता तासाला जवळपास १०० ते १२० किलो तुरीवर प्रक्रिया करू शकतो आणि त्यातून जवळपास ७५ % उतारा असतो म्हणजे १०० किलो मागे ७५ किलो आपल्याला डाळ मिळते .त्याचबरोबर हरभरा ,मूग,उडीद यांच्या वर पण प्रक्रिया करण्यासाठी या मिलचा उपयोग करू शकतो .

तुरीपासून डाळ तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत ,एक म्हणजे तेल लावून कोरडी तूर भरडणे ,आणि दुसरी म्हणजे पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी भरडणे दुसऱ्या प्रकारात पाण्यात भिजत ठेवल्याने जीवनसत्वाचा आणि प्रथिनांचा ऱ्हास होतो. आणि त्याच अन्नद्रव मूल्य कमी होत .ग्रामीण भागात तुरीचे उत्पादन जास्त असले तरी प्रक्रिया करण्यासाठी शहरात डाळमिल आहेत शेतकऱ्याकडून कमी दरात घेऊन त्यावर प्रक्रिया करून .खूप चांगल्या दरात डाळ विकली जाते .१० ते १५ % च फक्त खेडेगावातून प्रक्रिया करून येणाऱ्या डाळीचं प्रमाण आहे .

डाळ मिल उद्योग चालू कुठे चालू करता येईल .

१) १०००० ते १२००० लोकसंख्या असणाऱ्या खेडेगावात.

२) तसेच ज्या ठिकाणी तुरीचे क्षेत्र आहे.

डाळ मिलचे भाग

धान्याची चाडी

चाडी म्हणजे जवळपास १० ते १५ किलो तूर ,व इतर धान्य त्यात बसतील एवढे भांडे म्हणता येईल त्याच्या बुडाला एक झडप असते.त्यांच्याद्वारे रोलर मध्ये जे धान्य पडते त्याचा वेग कंट्रोल केला जातो .

रोलर

रोलर हा मिलचा महत्वाचा भाग असतो .ज्याच्यात तुरीला क्रश केले जाते ,बेअरिंग च्या साहायाने फिरणारा गोल दंडुका आणि त्या खाली असणारी चाळणी .यांच्यात घर्षण होऊन तुरीवरील फोलपट बाहेर काढले जाते .जे चाळणीतून बाहेर पडते .

पंखा

तुरीतून बाहेर पडणाऱ्या फोलपटला बाजूला करण्यासाठी हा पंखा असतो .ह्यामुळे डाळ आणि फोलपटे वेगळी होतात .

चाळणी संच

यात वेगवेगळ्या दोन चाळण्या असतात ज्या कि डाळीतील चांगली डाळ आणि तुकडे आणि पावडर वेगळी करतात.

ऑगर कन्व्हेअर

हा महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये वेगळी झालेल्या डाळीवर प्रकिया होते म्हणजे थेंबाथेंबाने त्यावर तेल सोडतात ज्याने त्यावर एक तेलाचा थर बसतो .

किंमत

  • ताशी १०० किलो डाळ बनवायची किंवा तेवढ्या क्षमतेची मिल खरेदी करायची झाल्यास ती जवळपास ८०००० ते १००००० पर्यंत जाते ,
  • जर तुम्हला तशी ४०० किलो डाळ बनवायची झाल्यास तेवढ्या क्षमतेच्या डाळमिल साठी साधारण ३.५ लाख खर्च येतो .
  • आणि ७०० किलो पर्यंत डाळीवर प्रक्रिया करण्यासाठी जवळपास ४.५ लाख खर्च येतो .

भांडवल गुंतवणूक - २ ते ५ लाखापर्यंत साधारण

  • लागणार कच्चा माल- तूर ,हरभरा ,मूग इत्यादी डाळीयोग्य धान्य
  • कच्चा माल मिळण्याचे ठिकाण –  आसपासचा शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता .
  • मशिनरी किंमत – १ ते ४ लाख
  • मनुष्यबळ - ३ ते ४
  • विक्री कशी कराल – आसपासच्या डीलर सोबत टायप करून ,स्वतः पॅकेजिंग करून स्वतःचा ब्रँड वापरून विक्री करू शकता

मिनी डाळ मिल...

Letsupp Krushi

Agronext