लिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. पण चवीला कडू असल्यामुळे साल जास्त खाल्ली जात नाही. त्यासाठी लिंबाच्या सालीपासून जॅम, मार्मलेड आणि कॅण्डीसारखे विविध पदार्थ बनवून त्यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.
आपल्या सर्वांना परिचित असलेल्या लिंबामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. लिंबाप्रमाणेच लिंबाच्या सालीही अत्यंत फायदेशीर असते. सामान्यतः निरुपयोगी म्हणून लिंबाची साल फेकून दिली जाते. लिंबाच्या सालीमध्ये जीवनसत्त्व, पोटॅशिअम, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ यांसारखे अनेक पोषक घटक असतात. शास्त्रीयदृष्ट्या लिंबाच्या रसापेक्षा साल अधिक उपयुक्त असते.

सालीमधील आरोग्यदायी गुणधर्म
जॅम
जॅम बनविण्यासाठी पूर्ण परिपक्व झालेली पिवळ्या रंगाची लिंबे निवडावेत. निवडलेली लिंबे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. नंतर चाकूच्या साह्याने कापून त्यातील बिया वेगळ्या कराव्यात. कापलेल्या फोडी मिक्सरमधून बारीक करून त्याचा लगदा तयार करावा. लगद्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट साखर घालून मंद आचेवर शिजण्यास ठेवावे. मिश्रणामध्ये वेलची पूड टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करून घ्यावा. तयार जॅम निर्जंतुक बाटलीमध्ये भरून ठेवावा.
मार्मलेड
प्रथम लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. नंतर सुरीच्या साह्याने सालीचे काप करून बिया वेगळ्या कराव्यात. या फोडी ज्यूसरमध्ये टाकून ज्यूस तयार करून घ्यावा. नंतर लिंबाच्या सालीचे बारीक लांब काप करावेत. एका पातेल्यामध्ये साखर, पाणी, लिंबू रस आणि सालीचे काप एकत्रित करून घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे. मार्मलेड व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवून द्यावे.
कॅण्डी
कॅण्डी तयार करण्यासाठी परिपक्व लिंबू निवडावेत. लिंबे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. सुरीच्या साह्याने लिंबाचे काप करावेत. बिया आणि रस वेगळा करून घ्यावा. नंतर साली मिक्सरमध्ये घालून त्याचा लगदा तयार करावा. लगद्यामध्ये साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावे. मिश्रणामध्ये आवडीनुसार साखर, मीठ, काळे मीठ, जिरे पावडर आणि काळी मिरी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले घट्ट झाल्यानंतर उष्णता देणे बंद करावे. घट्ट झालेले मिश्रण थंड होण्यास ठेवून द्यावे. घट्ट मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या करून पीठी साखरेमध्ये घोळवून घ्याव्यात. तयार कॅण्डी हवाबंद बरणीमध्ये भरून पॅक करावी.
- चंद्रकला सोनावणे, ७९७२९९९४६४
(के.एस.के. काकू अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थ...
Letsupp Krushi