प्रतिनिधी : बेकरीच्या उत्पादनाद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्योती देशमुख यांनी आपला व्यवसाय यशस्वी केलाच, त्यापेक्षाही या व्यवसायाद्वारे त्यांनी इतर गरजू महिलांनाही रोजगार मिळवून दिला, हे अधिक महत्त्वाचे ठरले. अर्थातच हे सर्व करण्यासाठी माणदेशीने दिलेला पाठिंबाही खूपच कलाटणी देणारा ठरला, असे त्या आवर्जून सांगतात. रोजचे घरकाम सांभाळून बेकरीची उत्पादने स्वतःतयार करून त्याचे मार्केटिंग करणे आणि तेही रोजच्या रोज म्हणजे खूप मेहनतीचे काम. मदतीला इतर महिला असल्या तरीही हा सारा व्याप सांभाळायचा म्हणजे कष्टाला पर्याय नाही. ज्योतीताईंनी मात्र नेटाने या व्यवसायात जम बसविला.
उत्पादने : सुरवातीला त्या घरीच आइस केक, आइसक्रिम, गव्हाची बिस्किटे तयार करू लागल्या. त्यातून बेकरी उत्पादने करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
जिल्हा उद्योग केंद्राचे योगदान : जिल्हा उद्योग केंद्राकडे कर्ज अर्ज केल्यानंतर त्यांना ते मिळाल्यावर बेकरी उत्पादनासाठी आवश्यक मशिनरी खरेदी केली. लोकांना हेल्दी फूड दिले पाहिजे, या हेतूने प्रवास सुरू झाला. दिशा बेकर्स या नावाने 2018 पासून उत्पादन सुरू झाले. त्याचवेळी माणदेशीच्या गायकवाड यांच्याशी संपर्क झाला. साताऱ्यात झालेल्या माणदेशी महोत्सवात स्टॉल मिळाला. या महोत्सवामुळे त्यांच्या मनात व्यवसाय वाढविण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण झाला.
साखरेऐवजी गुळाचा उपयोग केला तर हे बिस्किट अधिक रूचकर होईल:
माणदेशीने वेळोवेळी दिलेल्या पाठबळामुळे उत्पादनात वाढ करीत हळूहळू विस्तार होत गेला. सुरवातीला घेतलेला ओव्हन अपुरा भासू लागला. नव्याने अधिक क्षमतेचा ओव्हन घेतला. गव्हाची, नाचणीची बिस्किटे, ब्राऊन ब्रेड, डोनेट, क्रिमरोल, खारी, टोस्ट बटर, लादी पाव अशा उत्पादनांची मागणी वाढू लागली. हे पाहून माणदेशीने विविध प्रकारे मदतीचे हात पुढे केले. माणदेशीच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांनी नाचणीचे बिस्किट खाऊन कौतुक तर केलेच.पण साखरेऐवजी गुळाचा उपयोग केला तर हे बिस्किट अधिक रूचकर होईल, असा सल्लाही दिला. त्याप्रमाणे आता बिस्किटांसाठी सेंद्रिय गुळाचा उपयोग केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. माणदेशीच्या मुंबई, सातारा येथील प्रदर्शनातील सहभाग उत्साह वाढविणारा ठरला. माणदेशीमुळेच गणपतीपुळेसह इतर ठिकाणच्या प्रदर्शनातही संधी मिळाली.
प्रदर्शनाचा उपयोग :
प्रदर्शनांमुळे ग्राहक जोडत गेले आणि व्यवसाय वाढत गेला. उत्पादन वाढल्यावर मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करण्याची गरज होती. माणदेशीकडून फेसबुक, व्हॉटसऍपचा वापर, अकाउंटसमधील बारकावे शिकता आले. सध्या रोज गव्हाची, नाचणीची सुमारे 70 किलो बिस्किटे, रोज 1000 ते 1200 डोनेट व इतर उत्पादने मागणीनुसार उत्पादित केली जातात. साताऱ्यातील दौलतनगर भागामधील घरातच रोज सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत काम चालते.
घरातील व्यक्तीचा हातभार :
पती, सासूबाई यांच्यासह घरातील सर्वांची मदत होते. वयाची 86 पेक्षा अधिक वर्षे पूर्ण केलेल्या सासूबाई जनाबाई देशमुख या उत्पादनाचे पॅकिंग करताना दिसतात, त्यावेळी सर्वांनी मिळून लावलेला हातभार व्यवसायाला उभारी देत असल्याचे लक्षात येते. या उत्पादनांपैकी बिस्किट आणि डोनेटला मोठी मागणी असते. सातारा शहरासह तालुका, कोरेगाव, जावळी या तालुक्यातील एजंटामार्फत सर्व उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहचतात.
लॉकडाऊनच्या काळातही उत्पादनांना मागणी राहिली. आता आणखी विस्तार करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही माणदेशीचे प्रोत्साहन प्रेरक ठरणार असल्याचे त्या नमूद करतात. बेकरीसारखा वेगळा उद्योग उभा करण्याची धडाडी ज्योतीताईंनी दाखवली. त्यांच्या जिद्दीला माणदेशीने दिलेली साथच पूरक ठरली, असे त्या अभिमानाने सांगतात.
मानदेश फाउंडेशनच्या वतीने ट्रेड फेअर
महिलांनी व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी माणदेशी फाउंडेशनच्या वतीने ट्रेड फेअर भरविण्यात येते, अशी माहिती माणदेशीच्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी दिली. या मशिनरींच्या प्रदर्शनासाठी सातारा, कोल्हापूर, मुंबई, दिल्ली व इतर अनेक ठिकाणच्या मशिनरी उत्पादकांशी माणदेशी टाय अप करते. प्रदर्शनातून महिलांनी आपल्या व्यवसायासाठी आवश्यक मशिनरीची माहिती घ्यावी, अनुभव घ्यावा, खरेदी करून मशिनरीचा वापर करून व्यवसाय वाढवावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना कमी मनुष्यबळात व कमी वेळात अधिक उत्पादन मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होते, असे शिंदे यांनी सांगितले.
या मशिनरी कमी दरात मिळण्यासाठी उत्पादकांशी चर्चा करुन माणदेशी संस्था महिलांना सहकार्य करते. याशिवाय महिलांसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा घेतल्या जातात. माणदेशीच्या बिझनेस स्कूल सेंटर्स व बसमधून डाळ मिल, राइस मिल, मसाले, पापड, कापूर, द्रोण पत्रावळी, वाती यासंदर्भातील मशिनरी वापरण्याचा अनुभव दिला जातो. त्यामुळे महिलांना मशिनरीचे फायदे समजतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेकरीसारख्या चाकोरीबाहेरच्या उद्योगात ज्योती देशमुख भक्कमपणे उभ्या...
Letsupp Krushi