बटाटा चिप्स चा ‘नेचर टॉप’ या ब्रॅण्ड

image

प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर व त्यांचे तीन भाचे अशा चौघांनी एकत्र येत ‘बटाटा चिप्स’ व मसालेदार उत्पादने उद्योग सुरू केला आहे. ‘नेचर टॉप’ या ब्रॅण्डद्वारे उत्पादनांना बाजारपेठही मिळवून देत त्यातून रोजगारनिर्मिती केली आहे. 

ताज्या शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने काही शेतकरी प्रक्रिया उद्योगामध्ये संधी शोधत आहेत. पुणे जिल्ह्यात चाकण-शिक्रापूर महामार्गालगत सुमारे वीस गुंठे जागेत त्यापैकीच डिलाइट स्नॅक्स फूड्स ही कंपनी सुरू झाली आहे. शिरूर तालुक्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर यांची शेती आहे. ते व त्यांचे तीन भाचे श्रीराम बजरंग भगत, संकेत युवराज मोहिते, बापू कैलास साबळे अशा चौघांनी त्या ठिकाणी बटाट्यावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.

अनुभव, विचारमंथन

आदेश सांगतात, की कोरोना संकट काळात नोकऱ्या धोक्यात आल्या. त्यामुळे सक्षम आर्थिक पर्याय शोधण्याच्या दृष्टीने माझे भाचे एकत्र आले. बाजारपेठांतील मागणी, संधी यांचा अभ्यास करून आपण उद्योग सुरू करावा व स्वतःसाठीच रोजगार तयार करावा असे त्यांनी ठरवले. कोणता पर्याय निवडावा यासाठी विचारमंथन केले. विविध उद्योगांची माहिती घेतली. भाचे श्रीराम यांना एका आघाडीच्या अन्न प्रक्रिया उद्योगातील खासगी कंपनीतील पंधरा वर्षांचा अनुभव होता. त्यातून बटाट्यावर प्रक्रिया करण्याचे निश्‍चित झाले. आदेश यांनीच मग आपली वीस गुंठे जागा, त्याचबरोबर पाण्याची सोय उपलब्ध केली. ५० लाख रुपयांपर्यंत भांडवलाची गरज होती. तीही उभी केली. प्रक्रियेसाठी आवश्‍यक पीलर, स्लायसर, ड्रायर, फ्रायर, मसाला ड्रम, पॅकिजिंग अशा विविध यंत्रांची खरेदी गुजरातहून केली. त्यासाठी जवळपास ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च आला.

खरेदी आणि प्रक्रिया

‘बटाटा चिप्स’ तयार करण्यासाठी लागणारा बटाटा स्वतःच्या शेतीसह गुजरातहून घेतला जातो. प्रसंगी शेतकऱ्यांकडूनही खरेदी होते. साधारणपणे प्रति किलो १० ते १५ रुपये दर त्यासाठी पडतो. खरेदीनंतर कंपनीमध्ये साठवणूक करून मागणीनुसार वापरला जातो. प्रक्रियेपूर्वी बटाटा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतला जातो. पिलरद्वारे साल काढली जाते. त्यानंतर ‘स्लायसर’च्या आधारे ‘चिप्स’ तयार केले जातात. ‘ड्रायर’द्वारे सुकवणी होते. त्यानंतर ‘फ्रायर’द्वारे तळून घेतले जातात. मागणीप्रमाणे मसाल्यांचा वापर करून उत्पादन तयार होते.

उत्पादनांचे ‘मार्केटिंग’

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, दौंड, पुणे शहर, तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर येथील किराणा व हॉटेल व्यावसायिकांना उत्पादने पुरवली जातात. मालाचा पुरवठा करण्यासाठी वाहनही घेतले आहे. सुरुवातीला ब्रॅण्ड स्थापित करण्यासाठी खूप कष्ट पडले. मात्र दोघे भाचे पूर्वी एका कृषी कंपनीत ‘मार्केटिंग’ विभागात नोकरीस असल्याने त्यांचा अनुभव कामी आला.

उत्पादने आणि किमत

‘नेचर टॉप’ असा उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. सॉल्टेड, टोमॅटो, मसाला, क्रीम ॲण्ड ओनियन अशा चार स्वादांमध्ये (फ्लेवर्स) चिप्स सादर केले आहेत. बाजारपेठेतील मागणीनुसार १५ ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम असे ‘फूड ग्रेड लॅमिनेटेड’ पॅकिंग केले आहे. अनुक्रमे ५ रुपये, ५० रुपये व १०० रुपये असे त्यांचे दर आहेत. जोडीला मसाला कुरकुरे श्रेणीतील सुमारे सहा ते सात विविध उत्पादने उपलब्ध केली आहेत. पदार्थांची ‘रेसिपी’, स्वाद, गुणवत्ता या बाबींमध्ये श्रीराम यांचा अनुभव उपयोगी ठरला आहे. ‘फूड सेफ्टी’ विषयी केंद्र सरकारच्या संबंधित संस्थेचा परवानाही घेतला आहे.

खर्च तपशील

गुणवत्तेत कोठेही तडजोड करीत नसल्याने बाजारपेठेत आमच्या उत्पादनांना पसंती मिळत असल्याचे आदेश सांगतात. चिप्स बनविण्यासाठी प्रामुख्याने बटाटा, तेल, मसाला, वीज, मजूर, पॅकिंग मटेरिअल, वाहतूक या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी दर महिन्याला सुमारे ८ लाख रुपये खर्च येतो. पैकी बटाटा आणि तेल यावरील खर्च सुमारे ५ लाख रुपयांच्या घरात आहे. महिन्याला सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. कोरोना संकटाच्या काळात अडचणी आल्याने आर्थिक फटकाही बसला.या उद्योगाच्या रूपाने चार महिला व काही पुरुषांना स्थानिक रोजगारही उपलब्ध झाला आहे. कामगारांना उद्योगाचे प्रशिक्षण दिल्याने त्यांच्यात कौशल्यवृद्धी देखील झाली आहे. येत्या काळात ‘ऑटोमेशन’चा वापर करण्याचे नियोजन व खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

संपर्क- श्रीराम बजरंग भगत, ८१२८५१७४०७, /  आदेश काटकर, ९६५७५३४५२४

बटाटा चिप्स चा ‘नेचर टॉप’ या ब्रॅण्ड...

Letsupp Krushi

Agronext